नागपूर : नागपूरहून मुंबईला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात दुर्मिळ अशी घटना घडली आहे. या विमानात बसलेल्या महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतल्याची माहिती समोर अली आहे. या घटनेनंतर विमानातील इतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.
याबाबत एअर इंडियाने 23 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेची पुष्टी केली. विंचूने दंश घेतलेल्या प्रवाशावर उपचार करण्यात करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
विमानात जिवंत पक्षी आणि उंदीर सापडल्याच्या घटना घडत असताना, एखाद्या प्रवाशाला विंचूने दंश केल्याची ही दुर्मिळ घटना घडली आहे.
23 एप्रिल 2023 रोजी आमच्या फ्लाइट AI 630 मध्ये एका प्रवाशाला विंचवाने डंख मारल्याची अत्यंत दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना घडली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ANI ला सांगितले.लँडिंग करताना या प्रवाशाला विमानतळावर डॉक्टर उपस्थित होते आणि त्यानंतर रुग्णालयात उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आमचे अधिकारी त्या महिला प्रवाशासोबत रुग्णालयात गेले आणि डिस्चार्ज होईपर्यंत प्रवाशाला सर्व प्रकारची मदत केली, अशी माहितीही त्यांनी दिली.
एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई विमानात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.