नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (१० फेब्रुवारी) रोजी ६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ४० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्री दत्ता एजन्सी प्रा.लि. यांच्या विरुध्द रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करुन ५,००० चा दंड वसूल केला. तसेच लॉ कॉलेज चौक जवळील जवाहर विद्यार्थी सभागृह आणि अमरावती रोड येथील कल्याण मंडपम यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.
धंतोली झोन अंतर्गत वंजारी नगर येथील बडवाईक बिल्डर यांच्या विरुद्ध रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करुन १०,००० चा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया येथील रजवाडा पॅलेस यांच्याविरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत टेका नाका कामठी रोड येथील जनाब हसन बेग यांच्या विरुध्द रस्त्यावर वेस्टेज व घरकाम मटेरियल टाकल्याबद्दल कारवाई करुन ५,००० चा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.