Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (१४ जानेवारी) रोजी ७ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ९० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
उपद्रव शोध पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत सुरी लॉन, जाफर नगर येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. तसेच धंतोली झोन अंतर्गत किसनलाल वाईन शॉप, रामेश्वरी चौक येथे कारवाई करुन ५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे नेहरुनगर झोन अंतर्गत स्वराज पब्लीक स्कुल, पवनशक्तीनगर येथे रु २५ हजाराचा दंड वसूल केले.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.