नागपूर : पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या मेडिकल चौकात ही घटना घडल्याची माहिती आहे. कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडाल्यावरुन वाद झाल्यानंतर ही मारामारी झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नागपूरच्या मेडिकल चौकात पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या तीन महिला लाल रंगांचा ड्रेस घातलेल्या एका महिलेला भर रस्त्यात मारत असल्याचं दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार मार खाणारी महिला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेली होती. तिने गाडीत पेट्रोल भरलं, मात्र तिच्या कपड्यावर पेट्रोलचे काही थेंब उडाल्याने तिने पुरुष कर्मचाऱ्याच्या सोबत वाद घालत मारहाण सुरु केली. त्यामुळे इतर महिला कर्मचारी धावून आल्या.
पेट्रोलचे थेंब उडाल्यावरुन वाद
कर्मचाऱ्यांनी आधी महिलेला पकडून जाब विचारला, मात्र हा वाद इतका पुढे गेला की त्या महिलेलाच मारहाण सुरु झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. पेट्रोल दरवाढीचा परिणाम म्हणून या घटनेकडे पाहिलं पाहिजे, अशी गमतीशीर चर्चाही सुरू आहे.
पाहा व्हिडीओ :