नागपूर : शहर ग्रामीण बिनतारी संदेश (वायरलेस विभाग ) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील साखरे यांचा कार्यालयात दारू पिऊन इतर पोलीस कर्मचाऱ्याशी अरेरावी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मागील दोन -तीन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हयरल झाला असून पोलीस विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस पडला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मनोज सिरसाट यांनी साखरे यांच्या जाचाला कंटाळून हा व्हिडीओ बनविला.
सध्या सोशल मीडियावर वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला कशा प्रकारे वागणूक देतो यावर सडकून टीका करण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (sp) विशाल आनंद यांनी याप्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे. या विभागीय चौकशीत जर सुनील साखरे दोषी आढळले तर त्यांचे निलंबन निश्चित मानले जात आहे.
पोलीस निरीक्षक सुनील साखरे यांचे पोलीस कार्यालयातील हे कृत्य अशोभनीय असून पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. तसेच सुनील साखरे यांचे बंधू अनिल साखरे नागपूर विभागात (वायरलेस विभाग ) सहाय्यक पोलीस उपायुक्त म्हणून काम करतात अशी माहिती आहे.