Published On : Mon, Jul 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मध्यरात्री नग्न अवस्थेत रस्त्यावर उतरले अन्…; नागपुरातील जोडप्याचं विचित्र कृत्य, Video समोर येताच खळबळ

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपू शहरात गेल्या काही दिवसांपासून चित्रविचित्र घटना घडत घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कारमध्ये प्रियकर-प्रेयसी अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर एक कुख्यात गुंड चालत्या दुचाकीवर आपल्या प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये एक दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नग्नावस्थेतील या दाम्पत्याचा हा व्हिडीओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये पती-पत्नी दोघेही नग्नावस्थेत असून पत्नी पतीच्या मागे धावताना दिसतेय. दरम्यान, हे दाम्पत्य मानोरुग्ण असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.

नेमका प्रकार काय?
नागपुरात एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक दाम्पत्य नग्न अवस्थेत रस्त्यावर चालत आहे. आजूबाजूला लोक असूनही त्याकडे लक्ष न देता हे दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालताना दिसतंय. पती घराबाहेर नग्न निघाला असता पत्नीही त्याच्या मागे तशाच अवस्थेत निघाली. व्हिडीओमध्ये पती पुढे पुढे जाताना दिसतोय. तर पत्नीदेखील नग्नावस्थेतच त्याच्या मागे मागे धावताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना लक्ष्मीनगर चौक ते माटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी (27 जुलै) रात्री घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दाम्पत्यावर उपचार करण्याचा सल्ला
या व्हायरल व्हिडीओची पोलिसांनीही तत्काळ दखल घेतली. बजाज नगर पोलिसांनी या दाम्पत्याचा शोध घेत त्यांना पोलीस ठाण्याला बोलावले. तेव्हा कुटुंबियांकडून ते दोघे पती-पत्नी मानसिक रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. या मनोरुग्ण दाम्पत्याला कुटुंबियांनी उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

कारमध्ये अश्लील चाळे
काही दिवसांपूर्वी नागपूरमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रियकर-प्रेयसी धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करताना दिसत होते. विशेष म्हणजे हे दोघेही ड्रायव्हिंग सिटवर बसून हा प्रकार करत होते. नागपूरच्या धरमपेठ भागात ही घटना घडली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल प्रियकर-प्रेयसीवर कारवाईचा बडका उगारला होता. सीताबर्डी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सूरज राजकुमार सोनी हा सनदी लेखापाल आहे. तर त्याची प्रेयसी अभियंता आहे.

चालत्या दुचाकीवर अश्लील चाळे
कारमधील अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी दुचाकीवर अश्लील चाळे करतानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कुख्यात गुंड दिसत होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तशी माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली होती.

Advertisement