चंद्रपूर :भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी तपन कुमार रॉय यांच्या आशीर्वादाने विश्वजित मुखर्जी यांची युवा विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.चंद्रपूर इंडियन नॅशनल ह्युमन राइट्स पार्टी हा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आघाडीचा पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून युवकांना बेरोजगारीतून बाहेर काढून स्वावलंबी व स्वयंरोजगार बनवणे हे कार्य करण्यात येते. इतकेच नाही युवकांसाठी पक्षांतर्गत विविध उपक्रमही राबविण्या येतात.
विश्वजित मुखर्जी यांच्या युवक अध्यक्ष विदर्भ या पदावर नियुक्ती संदर्भात त्यांचे भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
भारतातील महाराष्ट्र राज्यातील मानवाधिकार पक्षाचे युवा अध्यक्ष विदर्भ म्हणून अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी तुम्ही तत्परतेने काम कराल मानवाधिकार पक्षाला बळकट करण्यासाठी काम कराल. महाराष्ट्र राज्य ते भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पक्षाला सदस्य बनवून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, मोफत सेवा, मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी, पुढे येऊन मानवी समाजाच्या विकासासाठी लढा असे म्हणत मुखर्जी यांचे पक्षाच्या वतीने अभिनंद करण्यात आले आहे.