नागपूर : देवळी गुजर येथील रेशीम शेतकरी महेंद्र भागवतकर यांचे रेशीम कीटक संगोपनास व तुती बागेस श्री. ज्ञानेश भट, रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, गणेश राठोड, माजी सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, विजय रायसिंग, रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, भास्कर उईके क्षेत्र सहाय्यक यांनी भेट दिली.
ज्ञानेश भट यांनी मनरेगा योजना अंतर्गत या वर्षी तुती लागवड करीत असलेल्या नवीन शेतकरी यांना मार्गदर्शन केले , श्री. विजय रायसिंग यांनी रेशीम किटक संगोपन बाबत पावसाळी हंगामात काय व कश्या पध्दतीने काळजी घ्यावी, तसेच रेशीम उद्योग मधील कोष विक्रीचे नियोजनाची माहिती व मार्गदर्शन केले, यावेळी उपस्थित भालेराव रेशीम शेतकरी तथा माजी सरपंच, देवळी गुजर, शिवाजी झोडे, सरपंच देवळी गुजर व तुमडी येथील अंदाजे 12 शेतकरी उपस्थित होते.
भालेराव यानी मागील वर्षी 2.50 लक्षचे कोष काढले, गावात 10 एकर तुती नवीन वाढली, गावातील सरपंच झोडे यानी 2 एकर तुती रोपांची लागवड मनरेगा योजनांतून केली.
श्री भालेराव यांचे 250 अंडी पुंजचे संगोपन सुरु असून 29 तारखेअखेर 200 किलो कोष उत्पादन होईल. त्या पासून सरासरी रु 600 दर गृहीत धरल्यास 1 लक्ष 20 हजार उत्पन्न प्राप्त होईल. मागिल वर्षी 6 बैच सनोपन घेतले. आता 4 एकर तुती लागवड वाढवित असल्याचे श्री भालेराव यांनी सांगितले.