नागपूर : आयुष्यात एकदा तरी युरोप टूर करणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र इटलीमध्ये गेलेल्या दोन नागपूरकरांना आलेला अनुभव भयावह होता. पर्यटकांना लक्ष्य करणाऱ्या दरोडेखोरांच्या तावडीत हे दोन्ही पर्यटक सापडले. मात्र या घटनेनंतर त्यांना पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही. या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना आलेला अनुभव तुम्हाला परदेशात टूर काढण्याअगोदर विचार करण्यात भाग पाडू शकते.
नागपुरातील प्रख्यात वकील आणि सध्या ऑस्ट्रियामध्ये असलेल्या एका अभियंत्याला मे 2023 मध्ये अनुक्रमे मिलान आणि रोमच्या प्रवासादरम्यान खूप त्रास सहन करावा लागला. अभियंता हा आपल्या सहकाऱ्यांसोबत सुट्टीवर असताना रोमला गेला होता. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांच्या कारची खिडकी फोडून त्यांनी त्यांच्याकडून बॅग, रोख रक्कम आणि पासपोर्ट घेऊन पळ काढला.
हा त्रासदायक अनुभव सांगताना त्यांनी नागपूर टुडेला घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. घडलेला घटनेसंदर्भात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेलो असता मच्याकडे आधीच पुरेशी केसेस असल्याचा दावा करून आम्हाला त्याठिकाणाहून हाकलून लावले. म्हाला आमच्या तुटलेल्या कारमधून पुढच्या पोलिस ठाण्यात जाण्यास भाग पाडले गेले, जिथे त्यांनी फक्त तक्रार घेतली . त्यानंतर त्यांनी आम्हाला तेथून जाण्यास सांगितले.
भारतीय दूतावासाकडून मदत मागितल्यानंतर, त्यांनी भारतात परत येण्यासाठी आपत्कालीन प्रमाणपत्र (EC) प्राप्त केले आणि आता त्यांचे पासपोर्ट पुनर्प्राप्त करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहेत. प्रमाणपत्र दाखल करताना, त्यांना युरोपमध्ये अशाच प्रकारच्या घटनांना बळी पडलेल्या पीडितांची एक लांबलचक यादी सापडली.
दुसर्या एका घटनेत, 38 वर्षांचा अनुभव असलेले वकील अॅड. श्याम देवानी यांच्या कुटुंबाला इटलीमध्ये प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागला. अगोदरच बुकिंग करूनही, हॉटेलच्या खोल्या चेक-इनसाठी तयार नव्हत्या. त्यांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागली. यादरम्यान डुओमो जवळील प्राइमार्क स्टोअरमध्ये मॅकबुक प्रो, आयपॅड, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, रोख रक्कम आणि वैयक्तिक सामान अशा मौल्यवान वस्तू असलेली वकिलाची बॅगची चोरी झाली.त्यानंतर कुटुंबीयांनी ताबडतोब स्टोअर व्यवस्थापन आणि सुरक्षा कर्मचार्यांना याची माहिती दिली. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी त्यांनी विनंतीही केली. मात्र त्यांनी त्यांची विनंती नाकारली. त्याऐवजी त्यांना पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र पोलिसांनीही त्यांना कोणतीच मदत केली नाही.
इतर कोणतेही पर्याय नसल्यामुळे कुटुंबाने प्रकरणे स्वतःच्या हातात घेतली. वकिलाच्या आयफोनवर “फाइंड माय” अॅप वापरून, त्यांनी दुकानापासून अंदाजे 5.5 किलोमीटर अंतरावर, चोरीला गेलेल्या आयपॅडचे शेवटचे ठिकाणी ट्रॅक केले. मात्र त्यात ते निष्फळ ठरले. अटक प्रयत्नानंतर सेंट्रल स्टेशनजवळील कॅफे पासकुचीच्या टॉयलेटमध्ये वकीलाला लॅपटॉपची बॅग सापडली. लॅपटॉप, आयपॅड, पासपोर्ट आणि क्रेडिट कार्ड यासारख्या काही वस्तू त्यात होत्या. मात्र त्यातून रोख रक्कम, गॉगल, चष्मा, चार्जर आणि सुमारे 2000 युरो किमतीच्या इतर मौल्यवान वस्तू गायब होत्या.
कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन करण्यासाठी कॅफेच्या सुरक्षा कर्मचार्यांकडून मदत मागितली, परंतु त्यांची ही विनंतीही नाकारण्यात आली. नागपूर टुडेशी बोलताना अॅड दिवाणी यांनी रोमन पोलिसांकडून सक्रिय मदत न मिळाल्याने तेथील सुरक्षा व्यस्थेवर ताशेरे ओढले.
आम्ही उच्च अधिकार्यांकडून त्यांच्या चोरी झालेल्या वस्तुंना मिळविण्यासाठी Primark Store आणि Caffe Pascucci सारख्या ठिकाणी सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी करत आहोत. मला ठाम विश्वास आहे की उपलब्ध तंत्रज्ञान आणि माहितीच्या सहाय्याने गुन्हेगाराला पकडले जाऊ शकते. त्यामुळे आमच्यासारख्या नागरिकांना न्याय मिळू शकतो.
नागपूरमधील या दोन्ही व्यक्तींना आलेला अनुभव पर्यटकांच्या संरक्षणासाठी आणि भविष्यात असे गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षा उपाय आणि तातडीने कारवाईच्या गरजेची आठवण देणारे आहेत.
– शुभम नागदेवे