नागपूर/भंडारा: भाजपाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांच्या कमळ या चिन्हाला मत म्हणजे विकासाला मत. पटले आले तरच केंद्राच्या किमान 8 योजना या जिल्ह्यात येतील, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
तुमसर तालुक्याच्या परिसरात असलेल्या मोहगाव देवी, कुशारी, डोंगरगाव, खरबी, परसवाडा, देव्हाडी, गोबरवाही, सीतासावंगी आणि नाका डोंगरी या गावांमध्ये पालकमंत्री बावनकुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क करीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या गावातील सर्व सभांना मोठ्या संख्येने मतदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आ. चरण वाघमारे, उपसरपंच प्रियंका लांबट, महेश लेंडे, जि.प. सदस्या निरंजना साठवणे, रवी येळणे, बाबूजी ठवकर, सरिता वाडीभस्मे, दुर्गा लेंडे, कुशारी येथे संजय गभने, रामभाऊ साकोरे, नीताराम वानखेडे, सुखराम भिववगडे, सीमा साठवणे, शिवकुमार आगासे, बबलू मालेवार, श्रीराम येळणे, नाारायण साकोरे, वनिता येळणे, राकेश भुरे, राजेंद्र भिवगडे, डोंगरगाव येथे चांगोराव गभने, मंजुषा गभने, जगदीश पंचभाई, जयंत सेलूकर आदी उपस्थित होते.
केवळ साडे तीन वर्षात निवडणुका घेण्यास बाध्य करणे हा मतदारांचा अपमान असल्याचे सांगून पालकमंत्री बावनुकळे म्हणाले- या अपमानाचा बदला आता घेण्याची वेळ आली आहे. ज्या पटेल पटोले यांचे विळ्याभोपळ्याचे नाते होते, ते आता सख्खे भाऊ कसे? पटोले यांनी शेतकर्यांसाठी नव्हे तर व्यापार्यांशी हातमिळवणी करण्यासाठी राजीनामा दिला हे आता स्पष्ट दिसत आहे.
भाजपाचे उमेदवार हेमंत पटले निवडून आल्यानंतर या भागाचा विकास होणार आहे. मतदारांनी दिलेले कमळाचे मत हे विकासाला दिलेले मत आहे, हे समजून घ्यावे, असेही बावनकुळे म्हणाले.
आ. चरण वाघमारे यांनी या बैठकींमध्ये भंडारा जिल्ह्यात झालेली कामे जनतेसमोर ठेवली. सक्षम पालकमंत्री मिळाल्यापासून भंडारा जिल्ह्याला अनेक योजना मिळत आहेत. निधीही मिळत आहे. केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेत त्यांनी हेमंत पटले यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.