नागपूर : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. यात बारामती, कोल्हापूर, सांगलीसह इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात सकाळी ११ वाजता पर्यंत १८.१८ टक्के मतदान-
सकाळी 11 वाजेपर्यंत देशात एकूण 25.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान झाले आहे. लातूर – 20.74% ,सांगली – 16.61%, बारामती – 14.64% , हातकणंगले – 20.74% कोल्हापूर – 23.77% ,माढा – 15.11%, धाराशीव – 17.06%, रायगड – 17.18%, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 21.19%, सातारा – 18.94%, सोलापूर – 15.69%
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला-
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात आज तिसरा टप्पा असून या तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ जागांवर मतदान पार पडणार आहे.