Published On : Sat, Dec 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

वृंदावनची श्री कृष्ण चरित्र रासलीला आजपासून नागपुरात

Advertisement

नागपूर – लोटस कल्चरल अँड सपोर्टिंग असोसिएशन यांच्या वतीने आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संयोजनात वृंदावन येथील जगप्रसिद्ध स्वामी कृष्ण मुरारी जी यांच्या श्री गौर कृष्ण रासलीला संस्थान, वृंदावन द्वारे रविवारी 29 डिसेंबर 2024 पासून 12 जानेवारी 2025 पर्यंत गांधीबाग उद्यानात दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत 15 दिवसीय श्री कृष्ण चरित्र महा रासलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर शहरात चार वर्षांनी हे आयोजन होत आहे. यापूर्वी दरवर्षी दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. परंतू कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाचे आयोजन काही काळ थांबवावे लागले होते. कार्यक्रमाचे संयोजक दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, ‘आपली संस्कृती, इतिहास आणि धर्म तथा अध्यात्माशी नव्या पिढीला जोडण्यासाठी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान श्री कृष्ण यांच्या चरित्राबाबत निर्माण करण्यात येत असलेल्या भ्रमाचे निराकरण करून शाश्वत चरित्र स्थापित करण्याच्या उद्देशाने हे आयोजन असल्याचे दयाशंकर तिवारी म्हणाले.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते आणि सहयोगी परिश्रम घेत आहेत. गिरधारी मंत्री, विपुल मिश्रा, सुनील काबरा, अतुल मशरू, पवन जालान, रतन मदान, कल्यान चौबे, राजेश तिवारी, अविनाश साहू, प्रशांत गुप्ता, जीतू बाथो, रमाकांत गुप्ता, विवेक ठाकुर, उमेश ओझा, सुनील शर्मा, अनिल बावनगढ, कन्हैया राठौड़, डॉ, विजय तिवारी, कृपाशंकर तिवारी, अशोक शुक्ला, बृजभूषण शुक्ला, अजय गौर, अमोल कोल्हे, सिद्धार्थ जोशी, कविता इंगडे, मंदा पाटिल, कल्पना कुंभलकर, मंजु कुंभलकर, शीला दुबे, किरण श्रीवास्तव, रेखा साहू, ज्योती वर्मा, मालती बाथो आणि अन्नू यादव आदी सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करीत आहेत.

Advertisement