व्रुक्ष जगले तरच मानव जगतील – पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे प्रतिपादन
नागपुर -व्रुक्ष हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे .व्रुक्षामुळेच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहील .व्रुक्ष लावण्यासोबत ते जगविन्याची तळमळ अंगी बाळगावी असे आवाहन नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले .
राज्य शासनाच्या व्रुक्ष लागवडी च्या मोहिमेला यशस्वी करण्याकरीता पोलिसांनी सुध्दा सहभाग दर्शविला .
नागपुर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे प्रमुख उपस्थितीत आस्थापनेवरील पोलिस मोटार परिवहन विभाग येथील परिसरात वृक्ष लागवड -२०१९ कार्यक्रम अंतर्गत नुकतेच व्रुक्ष रोपण मोहीम राबविण्यात आली .
पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) नागपूर ग्रामीण चे दीपक वंजारी व मोटार परिवहन अधिकारी विवेक पांडव तसेंच ह्यावेळी नागपूर ग्रामीण येथील तांत्रिक व चालक पोलीस कर्मचारी यांनी रोपटे लाऊन व्रूक्श रोपणसह व्रुक्ष संवर्धन करण्याची देखील शपथ ह्यावेळी घेतली .लागवड करण्यात आलेल्या रोपटे मधे विविध प्रकारची व्रुक्षाची लागवड करण्यात आली . ह्यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .