नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) बुधवारी औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता नागपुरातील नव्याने बांधलेला वाडी उड्डाणपूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला आहे.अमरावती रोडदरम्यान प्रवास करणाऱ्या चालकांसाठी या उड्डाणपूलावरून वाहतूक करणे सोयीचे ठरणार आहे.
पीडब्ल्यूडीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत अवगत केले. मंत्र्यांकडून होकार मिळाल्यानंतर उड्डाणपुलाचे उद्घाटन केले जाईल, असा दावा करण्यात आला होता.
तत्पूर्वी वाहतूक कोंडी लक्षात घेता PWD अधिकाऱ्यांनी 27 ऑगस्ट रोजी हायकोर्टात सादर केले होते, की उड्डाणपूल 15 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
त्यानुसार उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान वाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी होत होती. 478 कोटी रुपयांच्या अमरावती रोड ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट (ARTIP) अंतर्गत अमरावती रोडवरील आरटीओ फ्लायओव्हरसह 2.4 किमी लांबीचा वाडी फ्लायओव्हर प्रस्तावित करण्यात आला आहे.