Published On : Tue, Oct 10th, 2017

वाड़ी नगर परिषदे तर्फे डेंग्यु नियंत्रण व निर्मुलना साठी धड़क मोहीम सुरु

Advertisement

वाड़ी(अंबाझरी): वाडी नगर परिषद परिसरात डेंग्यु व इतर साथीच्या आजारामुळे जिवीत हानी झालेली असून मोठ्या संख्येने नागरीक आजारी पडलेले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंन्द्र जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे उद्भवलेल्या परिस्थिती वर नियंत्रण व त्यांचे निर्मुलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी यांचे कडून जनजागृती अभियान व स्वच्छता मोहीम राबविणे सुरु झाले आहे. सदर मोहीमेेत पाणी साचलेले डपके, गटारे व अस्वच्छ परिसरामध्ये तेल/ब्लिचिंग पाऊडर टाकणे व धुर फवारणी यंत्रा द्वारे परिसरात धूवारणी सुध्दा सुरु केली आहे.

या नियंत्रण व मोहिमेवर एकूण ५३ विशेष पथकांचे गठण करण्यात आलेले असूण १०५ कर्मचारी कार्यरत आहे.ही मोहीम सुरक्षा नगर,नवनीत नगर,आंबेडकरनगर,शिवशक्ती नगर,शाहू ले आऊट,शास्त्री नगर,रघुपती नगर, वसंत विहार,कोहळे लेआऊट,बक्षी लेआऊट, त्रिलोक नगर,मंगलधाम सोसायटी,धम्मकिर्ती नगर,प्रशांत सोसायटी,गजानन सोसायटी, सत्यसाई सोसायटी,शिवाजी नगर,श्रीकृष्ण नगर,या ठिकाणी विशेष पथकाद्वारे सर्वे करण्यात आला आहे. एकूण ४३९७ घरांचे सर्वे दरम्यान ७९ रूग्ण आढळले असूण डेंग्यु सदृष्य आजार दिसताच त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन त्या परिसराची स्वच्छता व धुर फवारणी करण्यात आलेली आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तरी नागरीकांचे ही या परिस्थितीवर मात करण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. उपाययोजना सोबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आलेला आहे.नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत,नगराध्यक्ष प्रतिक्षा पाटील,उपाध्यक्ष नरेश चरडे,आरोग्य सभापती केशव बांदरे,व सर्व पदाधिकारी सदस्य मोहिमेवर लक्ष ठेवित असून वेळोवेळी होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेत आहे.

डेंग्यु आजारावर व मच्छरांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रतन विहार,म्हाडा कॉलनी,मंगलधाम सोसायटी,धम्मकिर्ती नगर, प्रशांत सोसायटी,गजानन सोसायटी,सत्यसाई सोसायटी,शिवाजी नगर,श्रीकृष्ण नगर,आदर्श नगर या वार्डामध्ये फवारणी करण्यात आली.एकूण २८९० घरामध्ये धुर फवारणी करण्यात आली. मंगलधाम सोसायटी व इतर ७९ विहीरीमध्ये मध्ये गप्पी मासे सोडण्यात आलेले आहे.वाडीतील ज्या उद्‌योग,हॉटेल व इतर व्यवसांयकांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट न लावण्यास अश्या व्यवसायीकावर न.प. तर्फे नोटीस देवून दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच ज्या लेआऊट मध्ये खाली प्लॉट असल्यास व त्यामुळे त्या परिसराला रोगराईचा त्रास होत असल्यास नियमानुसार नोटीस देवून असे भुखंड जप्त करण्यात येईल असे ही नप ने एका आवहन पत्रात सूचित केले आहे.

Advertisement