५० कामगार व ट्रक चालक ताब्यात!
वाडी: कोरोना च्या दुष्प्रभावाला थांबवण्यासाठी शासनाने सर्वत्र धारा १४४ जारी करून १४ एप्रिल पर्यन्त संचारबंदी घोषित केले आहे.त्या अनुषंगाने जमावबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे.नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश व हालचालीवर बंदी असताना काल शनिवारी वाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत वाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वडधामना परिसरात कार्यवाही करीत उत्तर प्रदेश ला एका ट्रक मध्ये ५०-६० च्या वर नागरिक-कामगाराला घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली.
वाडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहिती नुसार वडधामना येथून अशा पद्धतीचे कृत्य होणार असल्याची माहिती समजताच पोलीस पथक वडधामना येथे शनिवारी सांयकाळी ५.३० ला घटना स्थळी पोहचले.या ट्रक क्र.MH-40 AK -5267 ची आत मध्ये पाहणी केली असता ५० पेक्षा अधिक महिला-पुरुष जे कामगार वर्गातील होते दाटीवाटीने बसले होते.हे बघताच पोलीस संभ्रमात पडले. त्यांनी सर्वा कडून माहिती घेतली असता या मधून उत्तर प्रदेश च्या प्रतापगढ येथे जायचे होते.
कर्प्यु मुळे येथे जाण्यासाठी त्यांची कोणती सोय नसल्याने ,रोजगार बंद झाल्याने ,उपासमार व त्रास टाळण्यासाठी हे सर्व जण आपापल्या मूळ गावी जाण्याच्या नियोजनात असल्याचे समजले.
मात्र ही कृती नियमबाह्य क कायदाभंग करणारी असल्याने पोलीस पथकाने ट्रक सह सर्वाना वाडी पोलीस स्टेशनला आणले.सर्वांचे बयान नोंदवून वाडी पोलिसांनी ट्रक चालक शहेरयार अब्दुल मोहित खान वय ४२ ,रा.वडधामना याचेवर फिर्यादी पोलीस सिपाही भाऊराव तांदुलकर याच्या तक्रारीवरून कोरोना संसर्ग जन्य रोग फैलाव,जीवितास धोका,जमाव व संचारबंदी कायदा भंग कलम १८८,२६९ २७०,२७१,२७२,भांदवि ३७(३) व १३५ एम.पी.कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.तर या ५० पेक्षा अधिक कामगारांना नागपुरातील निवारा केंद्रात रवाना करण्यात आले.
वरिष्ठांना याची सूचना देऊन योग्य कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.या संदर्भात ट्रक कम्पनी संचालक यांनी सांगितले की हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणारे कामगार व त्यांचे परिवारातील सदस्य आहेत. प्राप्त स्थिती नुसार त्यांनी मूळ गावी सोडून देण्याचा हट्ट धरल्याने ट्रक चालकाने ही कृती केल्याचे दिसून येते,लाॅक डाऊन असल्याने या बद्दल मालक नात्याने त्यांना कल्पना नसल्याचे समजते.