नवी दिल्ली : ‘वाघ बकरी टी’ ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी 49 व्या वर्षी निधन झाले. कंपनीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या वृत्ताला दुजोरा दिला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर ते दवाखान्यात दाखल होते.
माहितीनुसार, पराग यांच्या राहत्या घरासमोर काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांना अहमदाबादच्या प्रल्हादनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. २४ तासांनंतर त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने, त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
सात दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या देसाई यांची प्रकृती रविवारी उशिरा फारच बिघडली व त्यानंतर त्यांचे निधन झाले.