नागपूर: कोणतीही संघटना ही ध्येयसमर्पित कार्यकर्त्याने उचललेल्या खारीचा वाटा व केलेल्या कामाशिवाय पुढे जाऊ सकत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता हाच संघटनेचा मुलाधार असतो. त्यामुळे कार्यकत्या कडे दुर्लक्ष म्हणजेच संघटन बांधनीला खीळ घालणे असा त्याचा अर्थ होतो. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ कल्पनाताई पांडे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघद्वारा संलग्नित नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे दिवाळी मिलन आयोजित कार्यक्रमात केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा च्या विद्ववत व अभ्यास मंडळाच्या होणाऱ्या आगामी निवडणूका लक्षात घेता नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचा च्या प्रत्येक जिल्हास्तरीय कार्यकारिणीनी व कार्यकर्त्यांनी संघटना बांधणीत कुठलीही कसूर ठेवता कामा नये, असे पण आव्हान त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विधानपरिषद चे आमदार श्री रामदासजी आंबटकर प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यापीठ शिक्षण मंचा ने वेळोवेळी केलेल्या पाठपूरवठा व आंदोलनामुळे प्राध्यापकाच्या समस्या सोडविण्यात यश आले आहे, असे त्यांनी नमूद केले. शासन दरबारी आपण सुद्धा प्राध्यापकाच्या समश्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लावून धरू, असे त्यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संयोजक व नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे महामंत्री डॉ. सतीश चाफले यांनी नागपूर विद्यापीठ नागपूर शिक्षण मंचाच्या माध्यमधून प्राध्यापकंच्या स्थान निश्चितीच्या प्रश्न, अंशकालीन प्राध्यापकाचा वेतनाचा तिढा, समाजकार्य महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविदयालयातिल प्राध्यापकांच्या अडचणींचा निपटारा करण्यात निरंतर आंदोलनातून शिक्षण मंच कश्याप्रकारे आपली भूमिका पार पाडत आलेला आहे, यावर त्यांनी विस्तृतपणे प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे शिक्षण मंचाच्या वैचारिक ध्येयधोरणावर प्रकाश टाकला व संघटना बांधणीसाठी प्रत्येकानि खारीचा वाटा उचलायला हवा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून नागपूर ग्रामीण जिल्ह्याची नवीन कार्यकारणी घोषीत करण्यात आली. सहाशे च्या वर प्राध्यापक या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ मायवाडे, डॉ वाघ ,डॉ संजय टेकाडे,डॉ तुषार चौधरी ,डॉ राजकुमार खापेकर प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ राजकुमार खापेकर तर आभार डॉ तुषार चौधरी यांनी मानले.