मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बीड जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल’ या विषयावर ग्रामविकास, महिला व बालकल्याण तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. २७ मार्च रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील रेल्वे विकास प्रकल्प, रस्ते विकासाला गती, पर्यटन विकास, स्वच्छ भारत अभियान, बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रचा विकास तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबतची माहिती श्रीमती पंकजा मुंडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात दिली आहे.