क्षणार्थ केला रस्ता रोको आंदोलन
कामठी :- वीजचोरी टाळण्यासाठी तसेच नागरिकांना योग्यरीत्या विद्दुत सेवा मिळावी या मुख्य उद्देशाने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नाला यशप्राप्त होत कामठी शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम जोमात सुरु करण्यात आले या पाश्वरभूमीवर प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या परिसरात सुरू करण्यात आलेले भुमिगत वीज वाहिनीचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जासह निष्काळजी पणाने केले असल्यामुळे या भूमीगत विज वाहिनीच्या भोंगळ कारभारामुळे नुकताच एका डूकराचा विद्दूत शॉक लागून मृत्यू झाला असून अशी जीवघेणी घटना परिसरातीक चिमुकल्या बाळासह कुठल्याही नागरिकांशी घडू शकते तसेच यासंदर्भात संबंधित महावितरण विभागाला अवगत करूनही सदर विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने संबंधित विभागिय प्रशासनाचे लक्ष वेधून घेणे तसेच या जीवघेण्या प्रकारापासून नागरिकांना सुरक्षितता मिळावी या मुख्य उद्देशाने कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजता गोयल टॉकीज चौकात क्षणार्थ रस्ता रोको आंदोलन करून संबंधीत प्रशासनाचे लक्ष वेधुन घेतले यावेळी प्रभाग क्र 10 चे बहुतांश नागरिकांनी रस्त्यावर ऊतरून प्रशासना विरोधात आवाज उठविला.
प्राप्त माहिती नुसार मागील सहा महिन्या पासुन महावितरण विभागाकडून श्री टॉकीज ते संजय केसरवाणी यांचे घर तसेच वर्धमान उमाठे व श्रावण मस्के यांच्या घरापर्यंत भूमिगत विज वाहिनीचे काम करण्यात आले होते तसेच या मार्गावर पथदिवे उभारणीचे सुद्धा काम करण्यात येऊन त्यासाठी भूमिगत इलेक्ट्रिक वायरिंग करण्यात आली दरम्यान भूमिगत वीज वाहिनी चे काम करतेवेळी बहुधा ठिकाणी अर्धवट सोडलेल्या खड्डयात पडत असलेल्या पाणी मुळे शॉर्ट सर्किट ची घटना घडत असते तर नुकताच भागूबाई समाज भवन जवळील परिसरात नेहमी होणाऱ्या शॉर्ट सर्किट च्या घटनेला एका डुकराच्या जीवाला बळी द्यावा लागला अशी बळी देण्याचा प्रकार कुठल्याची जिवंत चिमुकल्या बाळासह प्रौढ व्यक्तीवर येऊ शकते तर या प्रकारच्या मनुष्य वधाच्या घटनेला कुणाचा ही बळी न जावो यासाठी संबंधित महावितरण विभाग, नगर परिषद प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला अवगत करण्यात आले मात्र या सर्व विभागाकडून सदर घटबेसंदर्भात मागील सहामहिन्या पासून कुठलेही गंभीर दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने आज प्रभाग क्र 10 च्या नागरिकांना रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करून रस्त्यावरील खड्ड्यांचे सिमेंट काँक्रीटीकरन करीत भूमिगत वीज वहिनीच्या दुरुस्तीचा मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली.
रस्त्यावर नागरिक उतरले असल्याची माहिती कळताच एसीपी मुंडे, पोलीस उपनिरीक्षक भानुसे यांनी पोलीस पथकासह सदर घटनास्थळ गाठून आंदोलन स्थिती नोयंत्रणात आणून संबंधित महावितरण विभागाचे अधिकारी व आंदोलन कारी अजय कदम व नागरिक यांच्यात समनव्य साधल्या नंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
संदीप कांबळे कामठी