Published On : Thu, Apr 11th, 2024

वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस अडचणीत; सूनेने केले कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्धा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रामदास तडस निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत सापडले आहे. तडस यांच्या सुनेने त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकाप परिषदेत पूजा तडसही उपस्थित होत्या.

पूजा तडस म्हणाल्या की, तडस परिवारातील लोकांकडून माझा छळ करण्यात आला आहे. मला रॉडने मारहाण करण्यात आली. मला मुल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए टेस्क करा. मात्र आता खूप झाले.

Advertisement

पंतप्रधान मोदीजी यांची 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहे. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर त्यांनी मला थोडा वेळ द्यावा.माझे म्हणणे ऐकून घ्यावे आणि मला न्याय द्यावा,अशी माझी विनंती असल्याचे पूजा तडस म्हणाल्या आहेत.

माझे सासरे खासदार रामदास तडस म्हणतात मी मुलाला बेदखल केलं, मुलाला घरातून काढलं नाही, मग मला एकटीलाच का काढलं घराबाहेर? हे लोक माझ्याशी राजकारण असल्याचा आरोप पूजा यांनी केला आहे. माझ्यावर आणि माझ्या मुलावर उपासमारीची वेळ आली आहे.मला दोन वेळचे अन्नही दिले जात नाही,असेही पूजा म्हणाल्या आहेत.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केल्याने ऐन निडणुकीच्या तोंडावर ते अडचणीत सापडले आहे.