नागपूर : विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यात अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून सक्रिय झाला आहे.याचा परिणाम म्हणून आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होईल. महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे.
मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. सोलापूर, धाराशिव, बीड लातूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हजेरी लावू शकतो असे आयएमडीने जाहीर केले आहे.