नागपूर:भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता .यातच आता अचानक हवामान विभागाने नागपुर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
तरी नागरिकांनी स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही विभागाने केले.
आज 4 वाजून 54 मिनिटांनी मोबाईल SMS द्वारे नागपुर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना यासंदर्भात माहिती देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. या पावसाने शेती, फळबागा आणि इतर कृषी क्षेत्रांचे मोठे नुकसान केले आहे. काही भागांमध्ये गारपीटीने नुकसानीला आणखी भर टाकली आहे. दूसरीकडे नागपुरात उष्णताही कायम आहे.