Published On : Wed, Aug 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भांडेवाडी जलकुंभ, सुभान नगर जलकुंभ, पारडी -१ आणि पारडी-२ जलकुंभाचा पाणीपुरवठा ११ ऑगस्ट ला राहणार बाधित

लकडगंज झोन: कळमना मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्यासाठी शुक्रवारी १० तासांचे शटडाऊन |भांडेवाडी जलकुंभावरून नेहरू नगर झोन मध्ये होणाऱ्या नॉन -नेटवर्क भागामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील राहणार बंद....
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी ७०० मी मी व्यासाच्या कळमना मुख्य जलवाहिनीवरील, डिप्टी सिग्नल चौकात उध्दभवलेल्या गळती ला बंद करण्यासाठी येत्या ११ ऑगस्ट (शुक्रवारी) १० तासांचे (सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. ह्या तांत्रिक शटडाऊन मुळे लकडगंज झोन मधील ४ जलकुंभाचा : भांडेवाडी जलकुंभ, सुभान नगर जलकुंभ , पारडी १ आणि पारडी २ जलकुंभ ह्याचा पाणीपुरवठा शुक्रवारी बाधित राहणार आहे.

ह्या शटडाऊनमुळे लकडगंज झोन मधील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

Gold Rate
Monday 24 March 2025
Gold 24 KT 88,200 /-
Gold 22 KT 82,000 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पारडी – १ जलकुंभ: अंबे नगर , राम भूमी , राणी सती माता सोसायटी, सुरेंद्र नगर, स्वागत नगर, सुंदर नगर, भोळे नगर, आणि दुर्गा नगर आणि इतर भाग

पारडी –२ जलकुंभ : श्याम नगर नवीन नगर, दुर्गा नगर, शिवशक्ती नगर, गणेश मंदिर परिसर आणि भवानी नगर

सुभान नगर जलकुंभ: विजय नगर, नेताजी नगर, गुलमोहर नगर आणि भरतवाडा व इतर भाग

भांडेवाडी जलकुंभ: धरतीमाता , पवन शक्ती नगर , साहिल नगर , वैष्णोदेवी नगर आणि प्रधानमंत्री आवास योजना वसाहत (तरोडी-खुर्द )

मनपा-OCW यांनी नागरिकांना आपल्या वापरासाठी पाण्याचा संचय करून सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात भांडेवाडी जलकुंभावरून नेहरू नगर झोन मध्ये होणाऱ्या नॉन -नेटवर्क तसेच इतर भागामध्ये टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्याया गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.
अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात

Advertisement
Advertisement