नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी वडील अनिल देशमुख यांना भाजपाकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांवर भाष्य केले. नागपुरातील प्रेस क्लब येते आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तीन वर्षांपूर्वी खोटया आरोपात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. परंतु मा.न्यायालयाने त्यांना जामीन देतांना जे निरीक्षण नोंदविले आहे ते महत्वाचे आहे. न्यायालयाने जो जामीन दिला आहे तो मेडीकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणा विश्वासार्हता नसल्याच्या मेरीटवर दिला आहे. अनेकजन आता यावर भाष्य करुन जनतेची दिशाभुल करण्याचे काम करीत आहेत.
जे लोक जामीन रद्द करुन तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे त्यांनी आधी न्यायालयाने जामीन देतांना जे निरीक्षण नोंदविले आहे त्याचा अभ्यास करावा. त्यांच्या अश्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असा इशारा सलील देशमुख यांनी दिला आहे.
सलील देशमुख म्हणाले की, न्यायालयाने जामीन देतांना जे निरीक्षण नोंदविले आहेत ते महत्वाचे आहे. यात प्रामुख्याने
1.न्यायालयाने म्हटल्यानुसार – अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत.
2. न्यायालयाने म्हटल्यानुसार – अनिल देशमुख यांच्यावर एैकीव माहितीवर आरोप करण्यात आले आहे.
3. न्यायालयाने म्हटल्यानुसार – सर्व कागदपत्रे व बयान एैकल्यावर असे दिसते की, भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरु शकणार नाही.
४. २ वर्षापुर्वी न्यायमुर्ती चांदीवाल यांनी अनिल देशमुख यांना “क्लिन चिट” दिली.
असे असतांनाही भाजपाचे नेते मंडळी अनिल देशमुख यांना परत तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत. ज्या व्यक्तीने खोटे आरोप करण्यासाठी नकार देवून जेल मध्ये जाने मान्य केले. परंतु भाजपाच्या कटकारस्थानाचे ते भाग बनले नाही, त्यांना तुम्ही जेलमध्ये जाण्याच्या धमक्या देता. आमच्या परिवारावर 130 रेड झाल्यात, माझ्या सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करुन तिला त्रास देण्यात आला. संपूर्ण परिवाराला अडचणीत आणण्याचे काम केले. अश्यातही अनिल देशमुख हे झुकले नाहीत असेही सलील देशमुख यावेळी म्हणाले.