Published On : Thu, Aug 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आम्हाला फोडाफोडीच्या राजकरणात रस नाही,मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास ; बावनकुळेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई :आम्ही कधीही फोडाफोडीचे राजकरण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, म्हणून लोक भाजपमध्ये येत आहेत.पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो, आयुष्यातील १८ वर्ष द्यावे लागतात, वेळ द्यावा लागतो, जे लोक येतात त्यांना आम्ही घेतो, घरी जाऊन त्यांना आणत नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Gold Rate
Friday 21 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पक्ष उभा करण्यासाठी १८-१८ तास मेहनत घ्यावी लागते. पंतप्रधान मोदी यांच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी लोक भाजपमध्ये येतात. पक्ष उभा करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. इतर कोणत्याही पक्षात जेवढे पक्षप्रवेश झाले नाही, तेवढे पक्षप्रवेश सुरू आहेत. लोकांना मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाबाबत आनंद आहे. ते भाजपलाच मतदान करतील, असेही बावनकुळे म्हणाले.

मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांना टोल नाक्यावर थांबविले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. या घटनेनंतर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली होती. या टीकेला बुधवारी राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी भाजपाला दिला होता.

Advertisement