नागपूर : आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो कारण हा धर्म सार्वभौम, शाश्वत आणि या ब्रम्हांडासोबत अस्तित्वात आला आहे. धर्म हा भारताचा स्वत्व आहे, धर्म नाही. अनेकधर्म आहेत, परंतु या धर्मांमागील धर्म आणि अध्यात्म, ज्याला आपण धर्म म्हणतो, ते भारताचे जीवन आहे.हा धर्म शोधला नाही आणि कोणाला दिलाही नाही म्हणून आपण त्याला हिंदू म्हणतो, जो मानवता आणि जगाचा धर्म आहे. असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील विजयादशमी कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित होते. आज जोरदार पावसाने पथसंचलन, शारीरिक कवायतीमध्ये काही बदल करावा लागला. शतकपूर्ती वर्ष, विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भागवत म्हणाले, समरसता, सद्भावना पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी आणि नागरिक अनुशासन ही पंचसूत्री घेऊन संघाचे स्वयंसेवक येणाऱ्या काळात घरोघरी जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज जागतिक NE पातळीवर स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू असलेल्या संघ दाखले देत जगात हिंदूधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचेही ते म्हणाले.