Published On : Sat, May 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आपल्याला हुकूमशाही विरोधात लढायचे…तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले.

बाहेर येताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी केजरीवाल यांनी प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. मी पुन्हा परत येण्याचे वचन दिले होते आणि मी आलो आहे. आपल्याला या हुकूमशाही विरोधात लढायचे आहे, असे केजरीवाल म्हणाले.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान केजरीवाल २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्यानंतर केजरीवाल यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. यावर ७ मे रोजी सुनावणी पार पडली.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल निकाल राखून ठेवला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडे आत्मसमर्पण करावे लागणार आहे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement