मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मला सरकारमधून मोकळं करा, अशी मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.फडणवीसांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
निवडणुकांमध्ये हार-जीत ही होतच असते.
या लोकसभा निवडणुकांबद्दल बोलायचं झाल्यास मतदानाची टक्केवारी पाहिली तर या निवडणुकीत जागा जास्त मिळाल्या असत्या तर मताची टक्केवारी वाढली असती. मुंबईत 2 लाख मतं जास्त मिळाली असती. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून काम केले आहे.
हे जे यश-अपयश आहे ते सामूहिक जबाबादारी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. एका निवडणुकीने सगळं काही संपत नसते. त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही, असेही ते म्हणाले.