– श्रीच्या पालखीचे भाविकांनी घेतले दर्शन, गण गण गणात बोतेच्या जयघोशात दुमदुमला रामटेक परिसर.
रामटेक: संत श्री गजानन महाराज सेवा समिती, टिमकी नागपूर द्वारा श्रीगजानन महाराजांच्या रामटेक भेटीच्या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी नागपूर ते रामटेक पायी पालखी दिंडी काढली जाते.
यंदा पालखीचे 13 वे वर्ष असून यावर्षी सुध्दा मोठ्या हर्शोल्ल्हासात दिनांक 5 जानेवारी ला गांधी चौक , नागपूर येथील श्री हरिहर गजानन निवासस्थानातून पायी पालखी दिंडीच्या शुभारंभ करण्यात आला.ही पालखी रामटेक नगरीत दाखल होताच येथील भविकांतर्फे पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.
पालखीतील भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला व त्यानंतर रात्री मंदिरामध्ये मुक्काम झाला.
5 जानेवारीला पालखी रामटेक नगरीतील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
दरम्यान मार्गावर ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्थांतर्फे पालखीतील भाविकांना चहा, नास्ता, पाणी ,बिस्कीट, अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यानंतर पालखीने गडमंदिराकडे प्रस्थान केले.