Advertisement
नागपूर : रामकृष्ण नगर टेलीकॉम कॉलनी येथील टेलकॉम सोसायटीच्या महिलांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर रांगोळी काढून अनोखे स्वागत केले.
रामकृष्ण नगर ते प्रतापनगर टेलीकॉम कॉलनी या मार्गावरील रस्त्यावर महिलांनी रात्रभर जागून रांगोळ्या काढल्या. मागील दोन वर्षापासून तेथील स्थानिक महिला या स्त्युत्य उपक्रम राबवित आहेत. यामध्ये मुख्यत्वे पल्लवी दामले, मानसी भगत, ज्योती रूपडे, माया दामले, दीप्ती कुलकर्णी, श्रीमती पांडे यांचा समावेश होता.