नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायूसेनेच्या ‘राजहंस’ विमानाने आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, एअर मार्शल हेमंत शर्मा, अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह, विभागीय आयुक्त अनूप कुमार, सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुष्पगुच्छ देवून राष्ट्रपतींचे स्वागत केले.
खासदार अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आमदार नागो गाणार, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आ. गिरिश व्यास, आ. सुधीर पारवे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. समीर कुणावार, डॉ. राजीव पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.
विमानतळावरील स्वागताचा स्वीकार केल्यानंतर राष्ट्रपती दीक्षाभूमीकडे रवाना झाले.