नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबरला मतदान पार पाडले. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या ,उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सर्वांना आता निकालाची आतुरता लागली आहे. याकरिता येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल त्यानंतर राज्यात कुणाचे सरकार येईल हे कळेल.
महत्त्वाचे म्हणजे २०१९ निवडणुकीच्या तुलनेने यंदा महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मतदानाच्या दिवशी रात्री ११.३० पर्यंत महाराष्ट्रात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे.
अजूनही फायनल टक्केवारी बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो. तसेच नागपुरातही १२ विधानसभा मतदारसंघात सरासरी ६०.४९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यातील २८८ मतदारसंघात ६५.०२ टक्के सरासरी मतदान झालं आहे. त्यात ८ मतदारसंघात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून त्यात गडचिरोली, कोल्हापूर, परभणी, सातारा, सांगली, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर, हिंगोली या मतदारसंघाचा समावेश आहे. तर नागपूर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे भागात ७० टक्क्यां पेक्षा कमी मतदान झाले आहे.
image.png