मुंबई : शिवसेना आमदाराच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भाष्य केले.शिवसेना निकालात मला काही अडचण दिसत नाही, वेळेत निकाल द्यायला काही अडचण दिसत नसल्याचे नार्वेकर म्हणाले. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीपर्यंत येणार हे स्पष्ट झाले आहे.
डिसेंबर महिन्यातल्या हिवाळी अधिवेशनावेळी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी संपली. सुरूवातीला कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत याप्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते, यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आणखी 3 आठवड्यांची मुदत मागितली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याची मुदत दिली आहे.
तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे.अपात्रता याचिका विधिमंडळ अध्यक्ष कार्यालयाकडे दाखल केलेल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत हा निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल, अशा अनेक याचिका दोन्ही गटाकडून आल्या असल्याचे नार्वेकर म्हणाले.