नागपूर : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने, आशीर्वादाने राज्याच्या विकासाला गती मिळाली होती.
मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसतं भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात. ते आमच्याकडून काम करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देऊन जातात. हा त्यांचा मोठेपणा आहे. परंतू त्यानंतरही विरोधक टीका करत राहतात, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. दोन कोटींहून जास्त असलेल्या आमच्या बहिणींच्या खात्यात तीन हप्ते जात आहेत. विरोधक म्हणतात आम्ही ही योजना बंद करू परंतु कोणीही लाडकी बहीण योजना कधीच बंद करू शकणार नाही. कारण ही योजना आमच्या गोरगरीब बहिणींसाठी असल्याचे शिंदे म्हणाले.