कामठी :-कोरोना विषाणूच्या संसर्गचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने 23 मार्च पासून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन करून जीवनाशयक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहारावर बंदी घातल्याने येथील सर्वसामान्यांचे हाल बेहाल झाले आहेत मात्र अशा वैश्विक महामारीच्या काळात कुणीही अन्न धान्यपासून वंचित न राहावे यासाठी शासनाने पुढाकार घेत स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत धान्य पुरवठा करण्यात येत आहे .
यातच काही स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण कामात अनियमित पणा करीत असून गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारीत असल्याने शासनाच्या योजनेला गालबोट लावण्याचा प्रकार करीत आहेत ज्याची प्रचिती कामठी तालुक्यातील वारेगाव येथील रुपलाल यादव परवानाधारक स्वस्त धान्य दुकानातून दिसून येते या स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांकडून अधिकचे पैसे घेणे, धान्याची पावती न देणे, शिधा पत्रिका धारकांशी अरेरावीचो भाषा वापरणे, या प्रकाराला कंटाळून वारेगाव गावातील काही जागरूक मंडळींनी न्यायाची मागणी करित संबंधित तहसोलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी , आमदार यांना लेखी तक्रार देत पुरावे सुद्धा सादर करण्यात आले मात्र या स्वस्त धान्य दुकांनदारावर अजूनही कारवाही न झाल्याने या स्वस्त धान्य दुकानदाराला खुद्द प्रशासन पाठबळ देऊन नागरिकाच्या मागणीला केराची टोपली तर दाखवीत ना अशा विविध चर्चेला वारेगाव गावात उधाण येत आहे तर प्रशासनावर विश्वास ठेवलेल्या काही जागरूक नागरिकांनी त्या स्वस्त धान्य दुकांनदारावर कारवाही केव्हा होणार?अशी विचारणा करीत आहेत.
नुकत्याच लागू झालेल्या लॉकडाउन मध्ये एकही लाभार्थी उपाशी राहू नये यासाठी शासनाने अन्न सुरक्षा योजनेसह धान्य व अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना धान्य ची सोय करीत प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजने अंतर्गत शिधापत्रिका वरील प्रत्येक सदस्यांना पाच किलो मोफत तांदूळ देण्याचे जाहीर करून तसे स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात आले मात्र कामठी तालुक्यातील वारेगाव येथील रुपलाल यादव स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटपात अनियमितता करीत असून बहुतांश लाभार्थ्यांना धान्य उचल ची पावती सुद्धा दिली नाही तर याबाबत आवाज उठविले असता धान्य उचल ची ऑनलाईन पावती ही परवाना धारक रुपलाल यादव नावाची पावती न निघता प्रयाग देशराज यादव या परवाना धारक च्या नावाने पावती निघाली आहे तसेच लाभार्थ्यांकडून आगाऊ चे 150 ते 200 रुपये घेत असल्याने या बाबत काही जागरूक नागरिकांनी आवाज उठविला असता सदर दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरीत तुमको जो करना है वो करलो मै हर दरवाजे पर फुल चढाता तब राशन मिलता है
या भाषेचा वापर करून नागरिकांचा अपमान केला यासंदर्भात नजीकच्या पोलीस स्टेशन ला तक्रार देऊन पुरवठा विभागाला सुद्धा तक्रार करण्यात आली यावर पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप शिंदे यांनी तात्काळ वारेगाव येथील सदर रेशन दुकान गाठून संतप्त नागरिकाच्या भावना ऐकून दुकानदाराचे रजिस्टर ताब्यात घेऊन कारवाही करण्याचा गाजावाजा करून गेले मात्र हा सर्व देखावाचा प्रकार दिसला त्यातच यासंदर्भात सरपंच बांगरे, राजेश मेश्राम, पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे यांनी सुद्धा दुकान गाठून आपबितो जाणून घेतली मात्र यांना सुद्धा सदर दुकानदार न जुमाणल्याने ही स्वस्त धान्य दुकान इतरत्र वर्ग करण्यात यावी व सदर दुकान दारावर कारवाही करण्यात यावी या मागणीसाठी आमदार टेकचंद सावरकर, एसडीओ श्याम मदनूरकर तसेच तहसीलदार अरविंद हिंगे व जिल्हा पुरवठा अधिकारी कडे तक्रार करण्यात आली.
ही तक्रार करणाऱ्यात वारेगाव गावातील कैलास गोंडाळे, चंद्रभान दुधुके, शंकर गोंडाळे, विनोद गोंडाळे, नलिनी नाईक, पिंटू मेश्राम, राहुल लांजेवार, निखिलेश चनकापुरे, राजेंद्र मारबते, अंबादास पाटील, गुंडेराव भाकरे, सुरेश खडसे, विष्णू लेकुरवाडे, प्रमोद पाटील आदींचा सहभाग असून या सर्वांनी या स्वस्त धान्य दुकांनदारावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.