नागपूर : मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन पाच दिवस उलटले, तरी अद्याप मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप झालेले नाही. महाआघाडीत एकमत होऊ न शकणे हे विलंबाचे प्रमुख कारण मानले जात आहे.
मात्र, मंत्री भरत गोगावले यांनी हे वृत्त फेटाळले असून तिन्ही पक्षात सर्व काही सुरळीत असून आज सायंकाळपर्यंत मंत्र्यांना खातेवापट करण्यात होईल, असे गोगावले यांनी सांगितले. यासोबतच खात्यांसोब सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचाही निर्णय आज होणार असल्याचेही गोगावले म्हणाले.
आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी आमच्यावर देतील, ती आम्ही स्वीकारायला तयार आहे. काम करणाऱ्या माणसाला कोणतंही खातं मिळालं, तर तो त्या खात्याला न्याय देऊ शकतो. राज्याचा मंत्री होणं ही सर्वांत मोठी बाब होती, ती एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
आमच्या गोरगरिब, कष्टकऱ्याची एकच इच्छा होती. ती मंत्रिपद मिळाल्याने पूर्ण झाली आहे. त्यांना काय माहिती की, कोणतं खातं असतं किंवा काय असतं ते. आपला माणूस मंत्री व्हावं, एवढीच त्यांची इच्छा होती. ती एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. खातं कोणतंही मिळालं तरी आम्ही काम करत राहू. जनतेने जी सत्ता महायुतीच्या हातात दिली आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे गोगावले म्हणाले.