अधिकृत विक्रेत्यावर जगण्याचा प्रश्न,अप्रत्यक्षरित्या जगणाèयांवर उपासमारीची वेळ,रेल्वे स्थानकावर शुकशुकाट
नागपूर– रेल्वे म्हणजे अद्भूत विश्व. रेल्वे गाड्यांची धडधड…प्रवाशांची वर्दळ…कुलींची धावपळ… रेल्वेची घोषणा अन् अधिकृत विक्रेत्यांचा आगळा वेगळा आवाजात प्रवासी गोंधळून जायचा. धावपळीच्या विश्वात स्थानकावर येणारा हरवून जायचा. आता या आठवणी आहेत, काही दिवसांसाठी. अल्पावधींसाठी ही शांतता असली तरी या स्टेशनवर अप्रत्यक्षरित्या पोटभरणाèयांची संख्या बरीच मोठी. मोजक्याच प्रवासी गाड्या धावत असल्याने अप्रत्यक्षरित्या जगणाèयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कधी सुरू होतील पूर्ण क्षमतेने रेल्वे गाड्या असा एकच प्रश्न विचारल्या जात आहे.
नागपूरमार्गे १५० पेक्षा अधिक प्रवासी तर २०० पेक्षा अधिक मालगाड्या धावायच्या. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर टाळेबंदीच्या काळात भारतीय जीवनवाहिनी थांबली. प्रवासी रेल्वे गाड्या काही काळासाठी बंद ठेवल्या तरी मालगाड्या, पार्सल गाड्या नियमित सुरू होत्या. मात्र, रेल्वे स्थानकाच्या भरोश्यावर अप्रत्यक्षरित्या जगणाèयांची संख्या बरीच आहे. अध्र्या अध्र्या तासांनी रेल्वे गाड्यांची धड धड होत असल्याने अधिकृत विक्रेत्यांची गरज आहेच.
त्यासाठी प्रत्येक फलाटावर खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर आठ फलाट आहेत. त्यापैकी १ ते ३ आणि ८ हे अतिशय व्यस्त असलेले फलाट. या ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टाल्स आहेत. काही स्टाल्स २४ तास सुरू असतात. याठिकाणी काम करणारे कामगार याशिवाय फळांचा रस आणि फळ विक्रेतेही. यासर्व कामांसाठी एकट्या नागपूर रेल्वे स्थानकावर जवळपास ७० ते १०० कामगार अप्रत्यक्षरित्या जगतात. आता त्यांच्यासमोर जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जगायचे तर आहेच त्यामुळे बहुतेकांनी आपआपल्या पध्दतीने काम शोधले काहींनी सहज मिळणारा काम म्हणजे भाजी विक्रीचे काम सुरू केले आहे.
दुसरीकडे काही प्रवाशांना खाद्य पदार्थ आणि भोजनाची इच्छा असली तरी उपब्लधच नसल्याने
यासोबतच प्रवाशांचे ओझे वाहून नेणाèया कुलींचे सुध्दा पोट रेल्वे स्थानकावर आहे. आता रेल्वे गाड्याचे प्रमाण कमी. त्यामुळे प्रवाशांची संख्या सुध्दा फारच कमी झाली. त्यातही कोरोनाच्या भीतीपोटी काही प्रवासी स्वत चे सामान स्वत चे घेवून जातात. त्यामुळे कुलींच्या हाताला कामच उरले नाही. जवळपा १४३ कुलींपैकी सध्या ४५ ते ५० कुली प्रत्यक्षात कामाला आहेत. हाताला कामच नसल्याने बिहार, राजस्थानवरून अद्याप ते परतले नाही. आहेत त्यांनाच काम नाही, पूर्ण क्षमतेने कुली कामावर आल्यास त्यांच्या हाताला काम मिळेल का?
नागपूर रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटो केंद्र आहे. मात्र, हे केंद्र गेल्या पाच महिण्यांपासून बंद आहे. ऑटोचालकही अप्रत्यक्षरित्या गाडी आणि प्रवाशांवर जगत होते. आता गाड्याच नाही, प्रवासीही नाहीत. त्यामुळे ऑटोचालकांचेही जगणे कठीण झाले आहे.
निराधार, बेघरांनाही फटका
नागपूर रेल्वे स्थानकावर ५० पेक्षा अधिक भिकाèयांची संख्या असायची. यासोबतच निराधार आणि बेघर असे १०० च्या जवळपास लोक जगायचे. प्रवाशांच्या भरोश्यावर ते पोट भरत होते. आता प्रवाशीच नाही, त्यामुळे निराधार, बेघर आणि भिकाèयांनाही फटका बसला. प्रवाशांकडून त्यांना पैसे, जेवन, खाद्य पदार्थ मिळायचे. येवढेच काय तर विविध प्रकारचे प्रवासी आणि धावपळीमुळे त्यांचे मनोरंजनही व्हायचे. आता कोणीच नाही त्यामुळे तेही रस्त्यावर आले आहेत.