नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतेच शिवसेनेतील आमदार अपात्रताप्रकरणी निकाल दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल नार्वेकरांनी हा निकाल ३१ जानेवारी रोजी देणे अपेक्षित होते. नार्वेकरांच्या वकिलांनी याबाबत वेळ वाढवून मागितला होता. १५ फेब्रुवारीसाठी आता अवघे काही दिवस उरलेले असताना या निकालाबाबत अद्यापही काही हालचाल दिसत नाही. त्यामुळे हा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज्यातील अनेक नेत्यांना जाता आले नाही. मुंबईतील अनेक रामभक्त या ट्रेनने अयोध्येला गेले आहेत. या आस्था ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्याकरता भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही यावेळी उपस्थित होते.
यावेळी नार्वेकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाकरता १५ फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे हा निकाल केव्हा लागणार? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी फक्त ‘जय श्रीराम’ असे उत्तर दिले.या उत्तरातून राष्ट्रवादीचा निकाल कधी लागणार हे पाहावे लागेल.