कन्हान : – कन्हान नदी काठावरील सत्रापुर शिवारात गावठी मोह फुलाची दारू भट्टी लावुन काढताना कन्हान पोलीसानी धाड मारून दोन आरोपीसह आठशे लिटर सळवा व ८० लिटर मोहा ची दारू असा एकुण ७२ हजार रूपया चा मुद्देमाल पकडला.
मंगळवार (दि.२८) ला दुपारी ३ वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीती वरून
कन्हान पोलीसानी कन्हान नदी काठावर सत्रापुर शिवारात भट्टी लावुन गावठी मोहफुलाची दारू काढत असताना एका एक धाड मारून ८० लिटर मोहफुलाची ताजी दारू किमत ०४ हजार रू व ८०० लिटर मोहफुल सळवा किमत ६४ हजार रू अशा एकुण ७२ हजार रूपयाचा मुद्दे मालासह आरोपी १) शेखर मलेश रेड्डी वय ३३ वर्ष, २)अपना आंनदराव लुट्टीपी वय ३५ वर्ष दोन्ही रा. सत्रापुर कन्हान यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्श नात उपोनि अमितकुमार आत्राम, राजेंद्र पाली, राजेंद्र गौतम, विरेंद्रसिह चौधरी, मुकेश वाघाडे, वैभव बोरपले, विशाल शंभरकर, सतीश तादळे, जितु गावंडे आदीने कामगीरी बजावली. ही पहिल्यां दाच कन्हान पोलीसानी कार्यवाही उत्तम रित्या पार पाडल्याने पोलीसाचे नागरि का कडुन कौतुक होत आहे.