नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही विरोधकांनी गाजवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले.
एकीकडे विरोधकांचे आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या आमदारांसोबत विधानभवन परिसरात फोटोसेशन केले.
विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच आमदारांचे फोटोसेशन शेजारीच सुरू होते. त्यामुळे एकीकडे आंदोलन तर दुसरीकडे फोटोसेशन असे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी महायुती सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
विरोधक जय भीमचे नारे देत असताना सत्ताधाऱ्यांनी कुठलीही नारेबाजी न करत शांततेत फोटोसेशन करून सभागृहाकडे वळले. तर फोटोसेशननंतर विरोधकांनी पुन्हा सरकारला धारेवर घेण्यास सुरुवात केली.