Published On : Wed, Dec 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

संसदेत गोंधळ घालणारे कोण आहेत ‘ते’ तीन लोक, त्यात एका महिलेचाही समावेश !

Advertisement
नवी दिल्ली :  संसद भवनावर 13 डिसेंबर 2001 रोजी म्हणजे  22 वर्षांपूर्वी  दहशतवादी हल्ला झाला होता. संसद हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज संसदेच्या आत आणि बाहेर एकच खळबळ उडाली. एकीकडे लोकसभेच्या आत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून खासदारांच्या बाकावर जाऊन रंगीत गॅस उधळला. तर दुसरीकडे संसदेबाहेर एका तरुण आणि महिलेने गॅस फवारून घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेत एकच खळबळ उडाली.

संसदेबाहेर झालेल्या या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नीलम आणि अनमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. नीलम ही महिला असून तिचे वय ४२ वर्षे आहे, ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. अनमोल शिंदे वय २५  दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. अनमोलच्या वडिलांचे नाव धनराज शिंदे असून ते महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी आहेत.

 म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने उचलले पाऊल- 
संसद भवनाबाहेर आणि  ट्रांसपोर्ट भवनासमोर ही घटना घडली. या दोघांनाही पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. दिल्ली पोलिसांसह इंटेलिजन्स ब्युरोची टीमही चौकशी करत आहे.संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांनी रंगाचा वायू सोडल्यानंतर ‘भारत माता की जय” जय भीम,’ ‘हुकूमशाही चालणार नाही’, अशा घोषणा दिल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
लोकसभेत दोन तरुणांनी घातला गोंधळ – 
 तर लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणाचे नाव सागर शर्मा असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, ज्या तरुणांनी सभागृहात उडी मारली ते एका खासदाराच्या नावाने लोकसभा अभ्यागत पासवर आले होते. सभागृहात गोंधळ घालण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
सागर शर्मा यांच्याशिवाय लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचे नाव मनोरंजन डी. आहे.  जो कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे. त्याचे वय 35 वर्षे आहे. बेंगळुरूच्या विवेकानंद विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकी पूर्ण केली आहे. खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर या दोन तरुणांनी संसदेत प्रवेश मिळवला होता. मात्र, संसदेच्या आत आणि बाहेर गदारोळ करणाऱ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा आणि गृहसचिव अजय भल्ला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदेत पोहोचले आहेत.

काय म्हणाले स्पीकर ओम बिर्ला?
या घटनेबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. तो धूर कशाचा होता हे आम्ही सगळे चिंतेत होतो. प्रत्यक्षात तो एक सामान्य धूर होता.

22 वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता हल्ला – 
22 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, यावेळी संसदेत मोठे नेते उपस्थित होते. या दृष्टीकोनातून पाहिल्यास संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे.

Advertisement