Advertisement
जालना: राज्यच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. यामाध्यमातून महिलांना १५०० रुपये महिन्याला देण्यात येणार आहे.
याच योजनेवरुन मुख्यमंत्र्यांना तृतीयपंथीयांनी प्रश्न विचारला आहे.मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर आम्ही कोण?असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली आहे.
तृतीयपंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा,आम्ही देखील समाजाचा घटक आहोत,आम्हाला देखील मतदानाचा अधिकार आहे, असे म्हणत आता तृतीयपंथीयांनी देखील या योजनेचा लाभ दिला जावा,अशी मागणी केली.जर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा लाभ दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू,असा इशाराही तृतीयपंथीयांनी सरकारला दिला आहे.