Published On : Fri, Mar 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राजकीय पक्षांना हजारो कोटींचे दान देणारे देणगीदार आहे तरी कोण ? वाचा माहिती

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील संकेतस्थळावर जाहीर केला. या तपशीलामध्ये कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली. तसेच कोणत्या देणगीदारांकडून मिळाली यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. देशभरातील अनेक नामांकित कंपन्या, व्यावसायिक दिग्गजांचा या यादीत सामवेश आहे. यानुसार देशातील सर्वाधिक देणगी देणाऱ्या दात्यांचे तपशील समोर आले आहेत.

निवडणूक आयोगाचा तपशील –
१२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या पाच वर्षांच्या काळात एकूण २२ हजार २१७ कोटी रुपये किमतीच्या रोख्यांची एसबीआयनं विक्री केली. यातील सर्वाधिक ८ हजार ६३३ कोटींचे रोखे भाजपाच्या नावे काढण्यात आले आहेत. या २२ हजार २१७ कोटींच्या रोख्यांपैकी १२ हजार ७६९ कोटींचे रोखे पाच वर्षांत वटवण्यात आले असून त्यातही भाजपानं सर्वाधिक ६ हजार ०६० कोटींचे रोखे वटवले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये भाजपानं जवळपास २०० कोटींचे रोखे वटवले.

Gold Rate
Tuesday 04 Feb. 2025
Gold 24 KT 83,400 /-
Gold 22 KT 77,600 /-
Silver / Kg 94,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यादीतील पहिले २० देणगीदार कोण ?
यादीतील २० देणगीदारांमध्ये लॉटरी व्यावसायिक, खाणकाम व्यावसायिक, थर्मल पॉवर व्यावसायिक ते अगदी मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांचाही समावेश आहे.

१. १३६८ कोटी – फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड … लॉटरीचा व्यवसाय करणारी ही कंपनी १९९१ साली स्थापन झाली असून त्यांचं मुख्यालय तामिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये आहे.
२. ९६६ कोटी – मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड… १९८९ साली स्थापन झालेली ही कंपनी धरणे व ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून तेलंगणात मुख्यालय आहे.

३. ४१० कोटी – क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड… २००० साली स्थापन झालेली ही कंपनी लॉजिस्टिक्स आणि माल पुरवठा सुविधांच्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

४. ३७७ कोटी – हल्दिया एनर्जी लिमिटेड… पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये या कंपनीच्या मालकीचा थर्मल पॉवर प्लांट आहे. २०१५मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं पुढच्या पाच वर्षांत तब्बल ३७७ कोटींची देणगी राजकीय पक्षांना दिली आहे!

५. ३७६ कोटी – वेदांता लिमिटेड… खाण उद्योगात देशातलं अग्रगण्य नाव असलेल्या या कंपनीची स्थापना १९६५ साली झाली. वेदांता देशातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे.

६. २२५ कोटी – एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड…. मुंबईतली ही कंपनी कच्च्या लोखंडाच्या खाणकाम उद्योगात कार्यरत असून १९५० साली स्थापन झाली आहे.

७. २२० कोटी – वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी….ऊर्जेचं उत्पादन आणि वितरण या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून २००९ साली स्थापन झाली आहे.

८. १९८ कोटी – भारती एअरटेल…. १९९५ साली स्थापन झालेली भारती एअरटेल कंपनी मोबाईल नेटवर्किंगच्या क्षेत्रात कार्यरत असून कंपनीचं मुख्यालय दिल्लीत आहे.

९. १९५ कोटी – केवेंतर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड….डेअरी आणि FMCG उत्पादनांच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे.

१०. १९२ कोटी – एमकेजे एंटरप्रायजेस लिमिटेड…. स्टेनलेस स्टील व्यवसायात मोठं नाव असणारी ही कंपनी १९८२ साली स्थापन झाली असून कंपनीचं मुख्यालय कोलकात्यात आहे.

११. १८६ कोटी – मदनलाल लिमिटेड

१२. १६२ कोटी – यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

१३. १४६ कोटी – उत्कल अॅल्युमिनियम इंटरनॅशनल लिमिटेड

१४. १३० कोटी – डीएफएल कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड
१५. १२३ कोटी – जिंदाल स्टील अँड पॉवर्स लिमिटेड
१६. ११९ कोटी – बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लमिटिडेड
१७. ११५ कोटी – धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
१८. ११३ कोटी – अवीस ट्रेडिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
१९. १०७ कोटी – टोरंट पॉवर लिमिटेड
२०. १०५ कोटी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

दरम्यान सर्वाधिक किमतीचे रोखे खरेदी करणाऱ्या पहिल्या २० देणगीदारांनी तब्बल ५ हजार ८३२ कोटी रुपये राजकीय पक्षांना दान केले आहेत.

Advertisement