नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? यावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीस स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनावणीसाठी शरद पवार पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.या सुनावणीला शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत.
याअगोदर 9 नोव्हेंबरला झाली होती. या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र सादर केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अजित पवार गटावर 420 कलमा अंतर्गत कारवाईची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
शरद पवार गटाचा दावा आहे की, अजित पवार गटाने मृत व्यक्ती, अल्पवयीन मुले, गृहणी, झोमॅटो डिलिव्हरी बॉय, सेल्स मॅनेजर अशा लोकांची प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केले. दरम्यान राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपला पाठिंबा दिला. या नेत्यांनी युती सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवार गटाने शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर आता या प्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे.