Published On : Tue, Apr 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी का केली नाही भाजपची निवड? का धरला काँग्रेसला हात…!

Advertisement

नागपूर:कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शाहू महाराजांचे संपूर्ण कुटुंबीय शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधामध्ये शाहू महाराज यांची लढत होणार आहे

‘या’ कारणाने केली काँग्रेस पक्षाची निवड-
कोल्हापूरच्या राजघराण्याचे वंशज शाहू छत्रपती यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतल्याने त्यांनी काँग्रेसची निवड केली, कारण ते त्यांच्या धाडसी सामाजिक सुधारणांसाठी समाजातील सर्व घटकांमध्ये ओळखले जातात. शाहू महाराज छत्रपती हे पहिल्यादांच निवडणूक लढणार आहेत. हे त्यांचे राजकीय पदार्पण असले तरी ते बराच काळ राजकारणाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याबाबत बोलताना ते म्हणाले, “हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे आणि स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असलेला संपूर्ण भारतीयांचा हा पक्ष आहे.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारताची लोकशाही धोक्यात-
भारताची लोकशाही सध्या धोक्यात आहे. लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आहे,शाहू छत्रपती म्हणाले. नेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने ही धोक्याची घंटा मानली जातआहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील कोल्हापूर राजघराण्याच्या महत्त्वाबाबत ते म्हणाले की, राजघराण्यातील सदस्यांनी लोकांच्या हितासाठी समर्पित असले पाहिजे आणि त्यांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे.

माझे पणजोबा राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची भरभराट झाली, ज्यांना त्यांनी समतेचे केंद्रबिंदू म्हटले.

मी भाजपशी असहमत-
माझे आजोबा एक प्रतिष्ठित समाजसुधारक होते. सर्वसमावेशक विकासासाठी उभे होते. त्यांनी कधीही लोकांच्या ध्रुवीकरणाला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी काम केले आणि मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो, असेही शाहू छत्रपती म्हणाले.
मला अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि लोककल्याण घडवून आणण्याचा आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवायचा आहे.काँग्रेसने देशाच्या विकासासाठी काहीही केले नाही यावर मी भाजपशी असहमत आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले.

Advertisement
Advertisement