नागपूर : कोराडी येथे ६६० मेगावॉटचे प्रत्येकी दोन युनिट प्रस्तावित आहेत. कोराडी येथील या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात पर्यावरणवाद्यांसह स्थानिक नारिकांनीही या प्रकल्पविरोधात आवाज उचलला. मात्र तरी देखील प्रस्तावित वीज प्रकल्पांचे पर्यावरण परिणामकारक मूल्यांकन करण्यात आले असून, २९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. अगोदरच नागपुरातील वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
यातच शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. इतक्या उन्हात जनसुनावणी का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या कार्यालय परिसरातच जनसुनावणी होणार असून अनेक पर्यावरणवाद्यांनी त्यावर आक्षेप घेतला. यापार्श्वभूमीवर ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोराडी 2×660 मेगावॅट कोळसा डसेड सुपरचे स्थलांतर करण्याच्या नागपूरच्या पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मागणीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला आहे. कोराडी येथील क्रिटीकल थर्मल पॉवर प्लांट संबंधित गडकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या जागेचा विचार करण्याची विनंती केली. मात्र अद्यापही यासंदर्भात कोणातच निर्णय घेण्यात आलेला नाही.
कोराडीतील वीज प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना कारवा लागणार आहे. यामुळे भूजल दूषित झाले असून, त्याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होणार आहे. इतकेच नाही तर हवेतील प्रदूषणातही यामुळे भर पडेल. हे नवे युनिट सुरू झाले तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. शासनाच्या वतीने नाशिकमध्येही अशाच प्रकारच्या प्रकल्पाची निर्मित करण्यात आली आहे. त्यामुळे इतर ठिकाणी हे प्रकल्प असताना ते नागपुरातच आणण्याचा अट्टाहास का? असा सवाल पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र सरकारने उन्हाळ्यात दुपारी १२ ते ५ या वेळेत कार्यक्रमांवर बंदी – सरकारने उन्हाळ्यात दुपारी १२ ते ५ या वेळेत कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मृतांमध्ये दहा महिला आणि चार पुरुष होते. या घटनेनंतर राज्य सरकारने भर उन्हात होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली. तरी देखील नागपुरात सरकारच्या या नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. २९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.