Advertisement
नवी दिल्ली : १३ डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसलेल्या दोन तरुणांनी सभागृहात उडी मारली. आपल्या बुटातून धुराच्या नळकांड्या काढल्या आणि घोषणाबाजी केली. या दोघांनाही खासदारांनी पकडले.
सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणावर बोलतांना राहुल गांधी म्हणाले, संसदेची सुरक्षा का भेदण्यात आली? याचा विचार करावा लागेल. देशात वाढलेली बेरोजगारी आणि महागाई ही कारणे या कृत्यामागे आहेत. संसेदत घुसखोरी केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपले मत मांडले होते. मात्र राहुल गांधी अद्याप यावर काही बोलले नव्हते.
या प्रकरणाशी निगडित असलेल्या सर्व सहा आरोपींची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यानसंसेदत दोन तरुणांनी केलेल्या घुसखोरी केल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते.