नागपूर : प्रेमाच्या जाळयात ओढून विधवा महिलेवर एका टॅक्सीचालकाने बलात्कार केला.तब्बल दोन वर्षे आरोपीने महिलेचे लैंगिक शोषण केले.यशोधरानगर पोलिसांनी पीडित ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली. सचिन महादेव येवले (३७) रा. यशोधरानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार,आरोपी सचिन विविध संस्थांमध्ये त्याचे वाहन भाड्याने लावतो. पीडित महिलेच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. महिला खासगी संस्थेत काम करून महिला स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते. फेसबूकच्या माध्यमातून
जुलै २०२१ मध्ये महिलेची सचिनशी ओळख झाली. सचिनने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. महिलेशी लग्न करण्याच्या आणाभाका घातल्या. या दरम्यान विविध हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
महिलेने आरोपीला लग्नासाठी विचारताच तो तिला शिवीगाळ करून धमकावू लागला आणि लग्न करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. महिलेने पेालिसांत तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सचिनला बेड्या ठोकल्या आहेत.