नागपूर : सदरमध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सोनिया मंडाले (३८)असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून राजेश मंडाले (४५, मॉईल वसाहत, छावणी) असे पतीचे नाव आहे.
माहितीनुसार, राजेश मंडाले हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्याला गेल्या तीन वर्षांपासून कँसर आहे. त्याच्यावर पत्नी उपचार करीत होती. मात्र, आजार दिवसेंदिवस वाढतच होता. मंडाले हा बेरोजगार असून त्याचे सोनिया यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांना पहिल्या पत्नीने सोडून दिले. पत्नी दोन मुलासह वेगळी राहायला लागली. त्यानंतर राजेश याने सोनिया हिच्याशी प्रेमविवाह केला. दोघांना १३ वर्षांची मुलगी आहे.
रविवारी सकाळी राजेशचा काही कारणास्तव वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. जेशने सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची तेरा वर्षीय मुलगी सकाळी झोपेतून उठली. तिने आईला हाक दिली असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने बेडरुममध्ये जाऊन बघितले असता वडिल गळफास घेतलेल्या तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तिने आरडाओरडा केला. शेजारी धावून आले लागेल सदरचे पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे मॉईल वसाहतीत खळबळ उडाली आहे.